विप्रो कंपनीचे शेअर्स दिवसोंदिवस खाली चालले आहेत, नक्की काय कारण आहे की जेव्हा इतर आयटी कंपन्या स्थिरस्थावर असताना विप्रोचे मात्र शेअर्सच्या बाबतीत अशा परिस्थितीत आहे?
गेल्या काही दिवसातील शेयर बाजाराची एकूण परिस्थिती पाहता विप्रोच्या समभागात झालेली पडझड ही बाजाराच्या एकूण वाटचालीशी सानुरूपच होती. केवळ विप्रोच्या समभागांचा विचार करायचा झाल्यास खालील पैकी काही महत्वपूर्ण कारणे या समभागाच्या पडझडी मागे दिसून येतात १. एकूणच आयटी क्षेत्रातील मंदी- भारतातील सगळेया मोठ्या कंपन्या या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर निर्भर करतात. अमेरिकेत सध्या मंदीचा काळ चालू आहे त्यातच रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद अमेरिकेवर पडत आहेत. त्यामुळे एकूणच आयटी कंपन्याना मिळणारी कामं मंदावली आहेत. २. विप्रोचे तिमाही निकाल - सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीचे निकाल प्रसिद्ध होताच विप्रोचा समभाग मोठ्या प्रमाणात खाली आला त्याचं कारण म्हणजे विप्रोचा नफा ९% खाली आला. २०२०-२१ मध्ये गाठलेल्या उच्चांकानंतर किमती जवळपास ६८ टक्क्याने खाली आल्या ३. मूनलायटिंग - मूनलायटिंग हा असा प्रकार आहे जेव्हा एक कर्मचारी दोन वेगळ्या आयटी कंपन्यांसाठी बिनदिक्कत कोणालाही न सांगता काम करत असतो. विप्रोने ३०० असे कर्मचारी नुकतेच काढले आहेत. घोटाळ्यामुळे कंपनीला तोटा झाला का आणि झालाच तर किती हे सगळे सांगणे तूर्तास अवघड आ...