शेअर मार्केट म्हणजे काही राॅकेट सायन्स नाही , सुरवातीला गुंतवणुक करताना थोडे निरीक्षण , सयंम आणी तर्क ( Logic ) करुन शेअर्स निवडणे आवश्यक आहे , सुरवातीला दमदार स्टाॅकमधे गुंतवणुक करुन यश मिळाले की आत्मविश्वास वाढतो आणी अभ्यास करुन पुढच्या पायर्या आत्मसात करणे सोपे जाते फक्त , आपल्याला जे माहीत नाही , कळत नाही त्यात गुंतवणुक करायची नाही हा नियम पाळणे महत्वाचे यासाठी एक अतीशय सरळ सोपी आणी साधी कसोटी आहे , तुम्हाला सुरवातीला गुंतवणुक करण्याचे स्टाॅक आपोआप लक्षात येतील 1. अश्या कंपन्यांचे शेअर निवडा की जे आपापल्या क्षेत्रात मार्केट लिडर आहेत , म्हणजे त्यांचा बाजारपेठेतील विक्रीचा हिस्सा 40% किंवा जास्त आहे , उदाहरणार्थ Asian Paints 2. दुसरी कसोटी म्हणजे ही वस्तु सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरातील असली पाहिजे , उदाहरणार्थ डोक्याला लावतो ते खोबरेल तेल , स्टाॅक Marico 3. तिसरी कसोटी म्हणजे सामान्य माणसाने ते उत्पादन आर्थिक मंदीत पण वापरले पाहीजे इतके गरजेचे असले पाहीजे , उदाहरणार्थ , पादत्राणे , कंपनी Bata , Relaxo 4. चौथी कसोटी म्हणजे ते अतीशय कमी किंमतीत उपलब्ध असले पाहीजे , उदाहरणार्थ मार...
शेअर बाजार माहिती