कॉल ( ce) आणि पुट ( pe) म्हणजे काय? कॉल ( CE) ऑप्शन म्हणजे काय ? जेव्हा अंडरलाईन आसेटची किंमत वरती जाण्याचा अंदाज असतो आणि त्यासाठी चा ऑप्शन खरेदी केला जातो, त्याला कॉल ऑप्शन म्हणतात. कॉल ऑप्शन हा तेजीचा संकेतक आहे. गणितातील समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण आठवतात का ? तर कॉल ऑप्शन हा अंडरलाईन च्या समप्रमाणात असतो. म्हणजेच अंडरलाईन आसेट ची किंमत वाढली, तर त्या प्रमाणात कॉल ऑप्शन ची किंमत ही वाढते. आसेटची किंमत कमी झाली तर त्याच प्रमाणात कॉल ऑप्शन ची किंमत ही कमी होत जाते. कॉल ऑप्शन जरी तेजी दर्शवित असला तरीही कॉल ची विक्री | CALL OPTION SELL करून मंदीची पोझिशन ही बनवता येते. रिलायन्सचा शेअर हा अंडरलाईन आसेट आहे. तर रिलायन्स ऑप्शन हा झाला डेरिव्हेटिव्ह. जर आत्ता 2500 असलेला रिलायन्स या महिन्यात 2600 जाणार आहे. असे टेक्निकल अनालिसिस ने समजते. तेव्हा ट्रेडर कडून रिलायन्सचा 2550 चा कॉल ऑप्शन खरेदी केला जातो, ज्याची किंमत आता 20 रुपये आहे ( 20×250 लॉट साईज = 5000) . ही किंमत म्हणजेच प्रिमीयम. पाठी मागील लेखामध्ये जे सदनिकेचे उदाहरण दिले होते. त्याच प्रमाणे इथेही तीन ...
शेअर बाजार माहिती