कॉल ( ce) आणि पुट ( pe) म्हणजे काय?
कॉल ( CE) ऑप्शन म्हणजे काय ?
- जेव्हा अंडरलाईन आसेटची किंमत वरती जाण्याचा अंदाज असतो आणि त्यासाठी चा ऑप्शन खरेदी केला जातो, त्याला कॉल ऑप्शन म्हणतात.
- कॉल ऑप्शन हा तेजीचा संकेतक आहे.
- गणितातील समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण आठवतात का ? तर कॉल ऑप्शन हा अंडरलाईन च्या समप्रमाणात असतो. म्हणजेच अंडरलाईन आसेट ची किंमत वाढली, तर त्या प्रमाणात कॉल ऑप्शन ची किंमत ही वाढते. आसेटची किंमत कमी झाली तर त्याच प्रमाणात कॉल ऑप्शन ची किंमत ही कमी होत जाते.
- कॉल ऑप्शन जरी तेजी दर्शवित असला तरीही कॉल ची विक्री | CALL OPTION SELL करून मंदीची पोझिशन ही बनवता येते.
रिलायन्सचा शेअर हा अंडरलाईन आसेट आहे. तर रिलायन्स ऑप्शन हा झाला डेरिव्हेटिव्ह. जर आत्ता 2500 असलेला रिलायन्स या महिन्यात 2600 जाणार आहे. असे टेक्निकल अनालिसिस ने समजते. तेव्हा ट्रेडर कडून रिलायन्सचा 2550 चा कॉल ऑप्शन खरेदी केला जातो, ज्याची किंमत आता 20 रुपये आहे ( 20×250 लॉट साईज = 5000) . ही किंमत म्हणजेच प्रिमीयम. पाठी मागील लेखामध्ये जे सदनिकेचे उदाहरण दिले होते. त्याच प्रमाणे इथेही तीन परिस्थिती तयार होतील 1. रिलायन्स एनालिसिस प्रमाणे 2600 ला गेला तर महिन्याच्या शेवटी म्हणजे एक्सपायरी ला ऑप्शन ची किंमत ही शंभर रुपये असेल. म्हणजे यामध्ये प्रीमियम चे वीस रुपये सोडून 30 (30×250 = 7500) रुपये नफा होईल. 2) जर रिलायन्स 2450 पेक्षा खाली राहिला तर जास्तीत जास्त दिलेल्या प्रीमियम एवढे म्हणजेच 5000 एवढे नुकसान होईल. याप्रकारे रिलायन्स सारखे मोठ्या अंडरलाईन आसेट मध्ये 5000 एवढ्या छोट्याशा रकमेमध्ये तेजीची पोझिशन बनवता आली. जसे की आपण मागील लेखामध्ये ऑप्शन ट्रेडिंग चे फायदे येथे उल्लेख केलेला आहे.
पुट ( PE) ऑप्शन म्हणजे काय ?
- जेव्हा एखाद्या अंडरलाईन आसेटची किंमत कमी होते आहे, आणि ऑप्शन ची किंमत वाढत आहे. त्या डेरिव्हेटिव्ह ऑप्शनला पुट ऑप्शन म्हणतात. म्हणजेच जेव्हा अंडरलाईन आसेट आहे ह्या किमतीपेक्षा कमी होणार असा अंदाज असतो तेव्हा पुट ऑप्शन खरेदी केला जातो.
- हा मंदी दर्शवणारा ऑप्शन प्रकार आहे.
- कॉल ऑप्शनच्या विपरीत पुट ऑप्शन हा अंडरलाईन आसेटच्या किमतीशी व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे अंडरलाईन आसेटची किंमत कमी झाल्यास पुटची किंमत वाढते , याउलट अंडरलाईन आसेटची किंमत वाढल्यास पुटची किंमत कमी होते.
- हा ऑप्शन प्रकार जरी मंदीचा दर्शक असला तरीही पुट विक्री | PUT SELLING करून कोणत्याही आसेटमध्ये तेजीची पोझिशन बनवता येऊ शकते.
Comments
Post a Comment