शेअर मार्केट म्हणजे काही राॅकेट सायन्स नाही , सुरवातीला गुंतवणुक करताना थोडे निरीक्षण , सयंम आणी तर्क ( Logic ) करुन शेअर्स निवडणे आवश्यक आहे , सुरवातीला दमदार स्टाॅकमधे गुंतवणुक करुन यश मिळाले की आत्मविश्वास वाढतो आणी अभ्यास करुन पुढच्या पायर्या आत्मसात करणे सोपे जाते
फक्त , आपल्याला जे माहीत नाही , कळत नाही त्यात गुंतवणुक करायची नाही हा नियम पाळणे महत्वाचे
यासाठी एक अतीशय सरळ सोपी आणी साधी कसोटी आहे , तुम्हाला सुरवातीला गुंतवणुक करण्याचे स्टाॅक आपोआप लक्षात येतील
1. अश्या कंपन्यांचे शेअर निवडा की जे आपापल्या क्षेत्रात मार्केट लिडर आहेत , म्हणजे त्यांचा बाजारपेठेतील विक्रीचा हिस्सा 40% किंवा जास्त आहे , उदाहरणार्थ Asian Paints
2. दुसरी कसोटी म्हणजे ही वस्तु सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरातील असली पाहिजे , उदाहरणार्थ डोक्याला लावतो ते खोबरेल तेल , स्टाॅक Marico
3. तिसरी कसोटी म्हणजे सामान्य माणसाने ते उत्पादन आर्थिक मंदीत पण वापरले पाहीजे इतके गरजेचे असले पाहीजे , उदाहरणार्थ , पादत्राणे , कंपनी Bata , Relaxo
4. चौथी कसोटी म्हणजे ते अतीशय कमी किंमतीत उपलब्ध असले पाहीजे , उदाहरणार्थ मारी बिस्किट , कंपनी Britania
5. पाचवी कसोटी म्हणजे उद्या आर्थिक मंदी आली तर उलट सामान्य माणसाने ते वापरायचे सोडले नाही पाहीजे , उलट त्याचा वापर वाढला पाहीजे , उदाहरणार्थ आपले बॅंक अकाउंट , स्टाॅक SBI
6. सहावी कसोटी म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाचा या उत्पादनावर फारसा परीणाम झाला नाही पाहीजे , याची गरज आणी स्वरुप तसेच राहीले पाहीजे , उदाहरणार्थ स्टाॅक Gillette India
7. सातवी आणी सर्वात महत्वाची कसोटी म्हणजे कंपनीची मॅनेजमेंट , याबद्दल कुठलाही प्रवाद नसावा , चांगली मॅनेजमेंटच कंपनीला आणी गुंतवणुकदारांना मोठे करत असते , उदाहरणार्थ ITC , Godrej Consumer , Tata Coffee
आता तुम्ही गुंतवणुकीसाठीचे चांगले स्टाॅक अगदी सहजपणे शोधु शकता , हे करताना काही सवयी महत्वाच्या आहेत
सर्वप्रथम म्हणजे तुमच्या बचतीमधली सर्व रक्कम गुंतवणुकीसाठी वळवु नका , जास्तीत जास्त 100 - तुमचे वय एव्हढेच % मर्यादित ठेवा , शेअर मार्केटमधे जोखीम असते हे कायम लक्षात असुद्यात
1. दैनंदिन उत्पादने वापरताना त्यांच्या कंपन्यांची आणी स्टाॅकची नावे शोधायची सवय लावुन घ्या , त्याचा अभ्यास करा
2. संयम आणी शिस्त पाळा , माझ्या सुरवातीच्या काळात या अभ्यासावर घेतलेल्या स्टाॅक पोर्टफोलिओचा परतावा मला 2.5 वर्षात 31% म्हणजे साधारण वार्षिक 14% - 15% होता , जो बराच आकर्षक आहे
3. यातील सातवा नियम कटाक्षाने पाळा , मॅनेजमेंट ही चांगलीच असली पाहीजे
4. मित्राने सांगीतले , पेपरमधे वाचले , TV वर / Youtube वर बघीतले म्हणुन न कळता स्टाॅक निवडु नका
5. वरील स्टाॅक उदाहरणार्थ दिले आहेत , सर्व एकाच प्रकारचे स्टाॅक निवडु नका , सेक्टरमधे ( Diversification ) ठेवा
या प्रकारच्या स्टाॅक्सना अचक्रिय ( Non Cyclical ) स्टाॅक म्हणणतात जे आर्थिक चढ उतारातपण वरील वैशिष्ठ्यांमुळे जास्त वर खाली होत नाहीत , संथपणे स्थिर रहातात
6. फुकट मिळाले तरी पेनी स्टाॅकच्या नादी ( कधीच ) लागु नका , ते तुम्हाला पेनी करुन सोडतील
7. फक्त यावर थांबु नका , शेअर मार्केट म्हणजे महासागर आहे , यात शिकुन पुढे कसे जायचे हे बघा
-राहुल देशमुख
True info
ReplyDelete