पेनी स्टॉक हे जरी स्वस्त वाटत असले तरी ते अतिशय धोकादायक असतात.
शेअर हा कधीहि स्वस्त वा महाग नसतो. लोकांची ही चुकीची धारणा आहे. १२ रुपयाचा शेअर स्वस्त आणि १२० चा शेअर महाग.
या बद्दल आपण थोडे उदाहरण देऊन पुढे जाऊया :-
ज्याप्रमाणे जेव्हा तुम्ही भाजीबाजारात जातात भाजी खरेदीसाठी. तेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश असतो, भाजी ताजी असते तेव्हाच जास्त करून जातात. संध्याकाळी जाणे तुम्ही टाळतात कारण तेव्हा भाजीची गुणवत्ता ही उतरली असती व रेट कमी का असेना तुम्ही अशी भाजी निवडणे पसंद करत नाहीत.
कारण इथे तुम्हांला माहिती आहे की जर चांगली भाजी घेणे असेल तर रेट जास्त का असेना पण सकाळी गेले हवे व जशी जशी संध्याकाळ होईल भाजी नीट दिसणार नाही. मग भलेही रेट कमी असो की जास्त असो.
अगदी तसेच, पेनी स्टॉक घेणे म्हणजे संध्याकाळी/रात्री भाजीबाजरात जाऊन भाजी खरेदी करणे होय.
तुमचा कष्टाचा पैसा आहे मग तो असा वाया का घालवायचा ?
पेनी स्टॉक मध्ये पैसे लवकर डबल होतात, वा खूप लवकर फायदा होतो हे सर्व अफवा आहेत. गुंतवणूकदार अडकला जावा म्हणून हा रचलेला सापळा असतो.
पेनी स्टॉकचे बरेच मोठे जाळे असते, काही ठरावीक लोक एकत्र येऊन त्यांचेकडे असलेले काही लाख, कोटी पैश्याने एक ठराविक त्यांच्याच शेअर क्रमाक्रमाने बाजारातुन विकत घेत असतात. ते जसे जसे विकत घेत असतात, तसे तसे भाव वाढत जातात कारण त्या जोडीला ब्रोकर, sms द्वारे त्याबद्दल मार्केट तयार केले जाते. मग त्याला मागणी वाढते तसे तसे हा शेअर वाढत जातो. यात होऊ शकते त्या कंपनीचे लोक जसे प्रमोटर पण सामील असू शकतात . जसे जसे भाव वाढत जातो तशी तशी मागणी वाढत जाते. आणि एक दिवस खूप मागणी वाढली व रेट वाढला की वरील सर्व जे एकत्र आलेले असतात ते सर्व जण एकदम सर्व शेअर बाजारात विकतात. व हा शेअर खालची दिशा पकडतो, म्हणजे लोअर सर्किट लागते. व तुम्ही, शेअर असून सुद्धा काही करू शकत नाही. कारण खरेदी करायला कोणीही नसते.व तुम्ही अडकतात. व शेवटी ३०, ४० ला घेतलेला शेअर नंतर १५,२० ला विकावा लागतो.
शेअर बाजारात तुम्ही शेअर मध्ये पैसे गुंतवत नसतात, तर त्या कंपनीत पैसे गुंतवीत असतात. कंपनीच्या व्यवसायात पैसे गुंतवीत असतात.
पेनी स्टॉक हा पेनी का असतात, कारण
त्यांचे व्यवसाय बंद असतात,
किंवा डबघाईला असतात.
कंपनी एकतर तोट्यात असते किंवा नाममात्र नफ्यात असते.
प्रमोटरने काहीतरी घोटाळा केला असतो त्यामुळे लोकांचा यावर विश्वास नसतो.
सरकारने व स्टॉक एक्सचेंजने जे जे नियम केले असतात त्याचा पालन न करणे.
कंपनीतील काही ठरविक माणसांनी स्वतःच्याच कंपनीच्या शेअरमध्ये व्यवहार करणे व शेअरचा भाव कमी जास्त करत रहाणे
आज मी सांगितले की रिलायन्स कॅपिटल मध्ये पैसे गुंतवा तर टाकणार आहे का ? नाही कारण माहिती आहे ही कंपनी आता बंद पडली आहे .
सुझलॉनचे शेअर घ्या, PC ज्वेलर्स, वक्रांगी यांचे शेअर घ्या असे म्हंटल तर तुम्ही घेणार का ?
चलती का नाम गाडी, बढती का नाम दाढी. तसे आहे बघा हे, जी कंपनी नीट सुरु आहे तीच टिकेल तिच्यामध्ये पैसे गुंतवा.
हे माहिती आहे ना की रेस मध्ये कोणीही लंगड्या घोड्यावर पैसे लावत नसतात. मग तसेच पेनी स्टॉक म्हणजे शेअर मार्केट मधील लंगडा घोडा आहे.
- Rahul deshmukh
Comments
Post a Comment